विचारलं मी त्याला...!
विचारलं मी त्याला...!
दिसला डोईवरी मजला
डोके बाहेर काढून पहात होता
म्हंटले असा कारे डोकावतोस
जरा समोर येना पाहतो तुला...
वरूणाने केली गर्दी माझ्या पुढे
संध मज रे सापडेना
तुला भेटण्याचा योग
बघ नारे अजून मज गवसेना...
तरी सांगतो धीर धर थोडा
आता मी रोज तूला भेटणार आहे
जीवन पुन्हा तुमचे नव्याने
सुजलाम सुफलाम करणार आहे...
तो भास्कर हसला अन
शब्द देऊनी नजरे आड झाला
पाहता पाहता परत पुन्हा
मुसळदार पाऊस सुरू झाला....!!!
