लेक माझी लाडाची
लेक माझी लाडाची


घरभर वाजे तुझे..
छुन छुन पैजण..
बहरुन जाते माझे..
सारे अंगण...
आवाज तुझा चाऊ माऊ..
बोबडे बोल बोले..
तुझ्या संगे सारे जण..
लहान बाळ झाले..
लुटूपुटू चालणं तुझं..
मागे चार जण धावत..
तरी त्यांना दमवून तू..
दारामागून वाकून बघत..
दिवस सरू लागले...
तुझ्यामागे धावता धावता..
तरूणपणाच्या पायरीवर तू..
तुला बघता बघता..
घरात तुझाच बोलबाला..
जरी असे तू लहान...
माझ्या सोबत होता..
तुझा एक एक क्षण..
दिवस आला निरोपाचा..
तुला अक्षतांचा आहेर..
जिथं हक्कानं भांडत होतीस..
तेच आता परकं माहेर..
कोण म्हणतं मुलगी..
पोटीच जन्मी यावी..
बहीण जरी माझी तरी..
तू तर लेक माझी लाडाची..