STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

5  

Sunita Ghule

Inspirational

रोपट्याचे गाणे

रोपट्याचे गाणे

1 min
287


इवल्याशा रोपट्याला घालू थोडं पाणी

वाऱ्यासवे बहरेल गात गोड गाणी।।धृ।।


मऊशार गर्द पाने, हिरवे गोजिरे

एवढेसे खोड,मुळे,देठ नाजूक रे

स्नेहभरे जोजवूया निसर्गाची राणी।।१।।


हिरव्या,हिरव्या रानाची शोभा निराळी

ऋतूचक्र सांभाळूनी तापमान पाळी

उष्ण उन्हाळ्याच्या वेळी शीत वारा आणी।।२।।


दुसऱ्यास सारे द्यावे शिकवण न्यारी

शितल छायेची किमयाच लई भारी

पाने,फळे,फुले,साल औषधाला गुणी।।३।।


दृष्टीसुख,हिरवाई प्राणवायू देते

धरणी मातेची सेवा,काळजी वाहते

प्रेमभरे समजावी सत्य माझी वाणी।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational