जीवन सुंदर आहे
जीवन सुंदर आहे
झऱ्याचे वाहणे
नदी शांतपण
प्रवाह सांगतो
जीवन सुंदर.
पक्षांचे गुंजन
सोनेरी पहाट
प्रकाश सांगतो
जीवन सुंदर.
आपत्य आपले
बदले जीवन
स्पर्श तो सांगतो
जीवन सुंदर.
मित्रांची संगत
प्रेमाची बहर
रुसवा सांगतो
जीवन सुंदर.
मृत्यूच असतो
अंतिमचे सत्य
तरीही सांगतो
जीवन सुंदर.
