चिंतन
चिंतन
समजून घेण्याइतपत खरंच,
मी समजदार आहे का ?
हुशारी दाखवण्याइतपत खरंच,
बऱ्यापैकी हुशार आहे का ?
दुसऱ्यांना सहकार्य करण्यासाठी,
माझा पुढाकार आहे का ?
दुसऱ्याची जिरवण्याकरता माझा,
सपशेल नकार आहे का ?
नवीन विचारांचे सहकारी ,
त्यांचा स्विकार आहे का ?
नाकेबंदी , कुटील बुद्धीबळाचा,
माझ्याकडून धिक्कार आहे का ?
माणसांचा माझ्याकडून नेहमी,
सदैव गुणाकार होतो का ?
नैराश्य आणि पराभवाचा,
भागाकार मी करतो का ?
सारे कळून बधिरासारखे,
वर्तन माझे आहे का ?
रोज विचारा स्वत:शीच की,
मी समजदार आहे का ?
