STORYMIRROR

Sarika Musale

Inspirational Others

4  

Sarika Musale

Inspirational Others

महामानवाचे कार्य

महामानवाचे कार्य

1 min
436

नष्ट करण्या भ्रष्ट जातीव्यवस्था

दूर करण्या अस्पृश्यता

रामजी-भीमेच्या पोटी 

महामानव जन्मला

   वाचाल तर वाचाल सांगाया

   शिकून संघटीत व्हावया

   शिक्षणाचे महत्त्व पटवाया

   महामानव जन्मला

आदर्श पुढे ज्योतिबांचा

संगे प्रखर बुद्धिमत्ता 

दहन करण्या मनुस्मृतीचा

नवा इतिहास रचाया महामानव जन्मला

    समतेचा संदेश द्यावया

    दीन-दलितांचा उद्धार कराया

    काळाराम मंदिर,महाडचा

    सत्याग्रह करण्या महामानव जन्मला

समाज परिवर्तन करावया

विषमतेला थारा द्यावया

संविधानात समान हक्क द्यावया

महामानव जन्म जन्मला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational