अंधश्रद्धा निर्मूलन
अंधश्रद्धा निर्मूलन
(डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना समर्पित करून)
२१ व्या शतकाच्या युगात विचार तुमचे सुंदर होते....
काही लोकांच्या मनात वेगळेच दुष्टचक्र होते....
अंधश्रद्धांच्या या साम्राज्यात गरज होती तुमच्यासारख्यांची....
दुष्ट काळानेही साथ दिली त्या वाईट प्रवृत्तीची....
सामान्य जनतेलाही मोलाचा आधार तुमचाच होता....
त्यामुळेच तर तो या दुष्ट-विळख्यापासून दूर होता....
तुमच्या विचारांचे पालन असेच सर्व करणार आहे....
कारण सर्वांना हवाहवासा वाटणारा आदर्श तुम्ही आहे....
कोणत्याही प्रकारचे आमिष न-बाळगता जनतेसाठी तुम्ही लढला....
कधीही विसरणार नाही जनता सारी तुमच्या या योगदानाला....
सदैव पेटत राहील मशाल तुमच्या या विचारांची....
अखंड देश आभारी राहील तुमच्या या मेहनतीची....
तुम्ही म्हणजे काही जादू-टोणा नव्हता....
तुम्ही म्हणजे नव्या युगाचे प्रतिक होता....
