काही प्रश्नांची उत्तरे
काही प्रश्नांची उत्तरे
माझी होणारी प्रेयसी....
मला सोडून गेलीस....
चूक काही नसताना....
शिक्षा गंभीर दिलीस....
तुला ठाऊक होते ते....
तरी विश्वास तोडला....
अशा आपल्या नात्यात....
तूच दुरावा आणला....
प्रेम तुझ्यासाठी खेळ....
मला तू खेळवलस....
केला नाही विचार तू....
मला तू रडवलस....
केले अर्पण सर्वस्व....
तूच फायदा घेतला....
प्रिये तुझ्याचसाठी हा....
साऱ्या लोकांत हारला....
असा विरह होईल....
तुला हे माहित होते....
धक्का लगेच देशील....
असे वाटले नव्हते....
हीच राहिलेली होती....
काही प्रश्नांची उत्तरे....
जशी अविस्मरणीय....
असे सुगंधी अत्तरे....
