विषय : महाराष्ट्राची संस्कृती
विषय : महाराष्ट्राची संस्कृती
आमची मायबोली मराठी
हीच आमची संस्कृती,
एकमेव अभिमानाची
मराठमोळी आकृती.!
सणांची आमच्या सुरवात
गुढी पाडव्यानेच होत असे,
हर्ष उत्साहास आतुर सर्व
आनंद उपभोगण्यास तसे.!
गणपती असो वा दहीहंडी
सर्व एकत्र येऊनि नांदती,
राग-वैराग्य विसरुनी
सर्वांचे सुख-भले पाहती.!
दसऱ्याच्या त्या सांजवेळी
सांस्कृतिक पोशाखात जमतो,
आपट्याची स्वर्ण-पाने वाटून
शुभेच्छांचा वर्षाव करतो.!
दीपोत्सवाच्या या सणाला
लहान थोर उत्सुक सर्व,
आयुष्याच्या या सुखद क्षणांचे
असे त्यांसाठी हे नवीन पर्व.!
लग्न-कार्यात असे पोशाख
धोतर-कुर्ता आणि फेटा,
शहनाई-चौघडा वाजे त्यावेळी
वाद्यवृंदचा आवाज मोठा.!
अंगावर येई दाट शहारा
जेव्हा वाजे ती तुतारी,
उत्सह अगदी निर्माण करी
आमच्या या मनी अंतरी.!
गड-किल्ल्यांचे प्रतीक
शिवबा आमचा राजा,
आदर्श आमची संस्कृती
गर्जा महाराष्ट्र माझा.!
