विश्वास तुझ्या प्रेमाचा
विश्वास तुझ्या प्रेमाचा
शेवटची ती भेट आपुली
झाली अशा एका ठिकाणी,
श्वासही बंद होणार होता
तेव्हा शब्द तुझे पडले कानी.!
आतुर झालो होतो तुझ्या भेटीला
पाहिजे होता तेव्हा तुझा सहवास,
तुजविण एकटे आयुष्य काढले
निरागस होता या जीवनाचा प्रवास.!
अंतक्षणी समजले तुजमुखी
कसे विभाजन झाले आपुले,
इतरांची इच्छा नसतानाही
नियतीने तेव्हा एकत्र आणले.!
विश्वास सखे तुझ्या प्रेमाचा
शेवटी जेव्हा मला कळला,
जगण्याची इच्छा असतानाही
तेव्हा अंतही नाही टळला.!
