शीर्षक: आतुर मन
शीर्षक: आतुर मन
तुझे स्मरण
मज हे मन,
मनी प्रतिक्षा
होई मिलन....1
मन हसून
स्वतः फसून,
राहे मी तुझी
वाट पाहून....2
आतुर मनी
प्रीत लोचनी,
मज ती आस
याच भावनी....3
कधी येणार
कुशी घेणार
मला प्रेमाने
मुका देणार....4
हर्ष लाडीत
प्रेम गाठीत
शृंगारलेही
अशा साडीत....5

