STORYMIRROR

Bhushan Tambe

Romance

3  

Bhushan Tambe

Romance

वाटे तुलाच पहावे

वाटे तुलाच पहावे

1 min
140


प्रिये आठवणी तुझ्या

त्रास मजला देतात, 

नाही रमत मनही

अश्रू डोळ्यात येतात.!


वाटे तुलाच पाहावे

त्याच सागरी किनारी, 

लाटा वाहती जोरात

पाणी दिसे ते सोनेरी.!


एकांत मज छळतो

सखे तुजविण आता, 

होती वेदना मनाला

तुटे काळीज राहता.!


माझ प्रेम तूच होती

नाही ते कळलं तुला, 

मोठी जखम दिलीस

आता हे कळलं मला.!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance