शीर्षक : प्रेमरंग
शीर्षक : प्रेमरंग
आसूसले
चक्षु माझे,
तुझी वाट
पाहे राजे....1
पाहताच
तुला जेव्हा,
मंत्रमुग्ध
झालो तेव्हा....2
आवाज तो
गोडं गाणी,
ऐकू येई
माझ्या कानी....3
व्हावा मला
तुझा स्पर्श,
मनी माझ्या
राही हर्ष....4
साजणी तू
स्वप्नातली,
माझ्याच या
आत्म्यातली....5
आठवणी
मनी दंग,
प्रेमाचे या
आहे रंग....6

