शीर्षक : माझा जीव
शीर्षक : माझा जीव
माझा जीव तुझ्यावर
असा काय तो जडला,
तुझ्याकडे पाहताना
स्तब्ध होऊन पडला.!
माझा जीव असेलच
तुझ्या अशा हृदयात,
प्रिये मला स्वीकारना
दोघे आहोत प्रेमात.!
माझा जीव टांगणीला
टाकू नकोस तू असा,
धक्का आता देऊ नको
मत बदलून तसा.!
माझा जीव होई मग्न
प्रेम वळणार तसे,
तूचं बोलली नाहीस
तर कळणार कसे ?
माझा जीव खूश असे
जसे मोर नाचे वनी,
प्रिये तूच माझी सखी
असे कायमची मनी.!

