STORYMIRROR

Bhushan Tambe

Romance

3  

Bhushan Tambe

Romance

शीर्षक - चाहूल

शीर्षक - चाहूल

1 min
219

चाहूल ती....

सृजनाची....

सख्ये तुझ्या....

प्रतिक्षेची....१


मोहरले....

तिचे तन....

शहारले....

माझे मन....२



कुशीत ते....

बीज रुजे....

हृदयात....

तूच सजे....३


क्षण धुंद....

आनंदाचे....

प्रेमरंगी....

बनण्याचे....४



साद कुणी....

ही घातली....

प्रिये माझी....

दचकली....५



कशी होऊ....

उतराई....

तुझ्यासाठी....

केली घाई.... ६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance