शीर्षक: प्रेमाचा गुलकंद
शीर्षक: प्रेमाचा गुलकंद
साठवून गुलाब मी
केला प्रेमाचा गुलकंद
तू दूर गेलास तरी
मन माझे हे मकरंद....
तुझ्या आठवणीने
अश्रूंचाही बांध फुटे
प्रेमाच्या या विरहाने
नात्यांचे हे बंधन तुटे....
आस लावली मी
माझ्या या मनाला
तुझाच स्पर्श जानवी
आजही माझ्या तनाला....
विसरणार नाही मी
प्रेमरंगी ते सर्व क्षण
नेहमीच होणार मला
सख्या तुझीच आठवण...

