STORYMIRROR

Sushama Gangulwar

Inspirational

4  

Sushama Gangulwar

Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
405

महाराष्ट्र माझा

आहे खूपच छान

कलाकृती ने नटलेले

सौंदर्याचे खान.......


लोक महाराष्ट्रातील

अगदी प्रेमळ व महान

रस्त्यावर चालणाऱ्याचे ही

ईथे भागवली जाते तहान......


गोर गरिबांना देतात

भर-भरून दान

एक दुसऱ्यांच्या परिस्थितीची

ठेवतात सारे जान.......


सण, वार, उत्सव

साजरे करतात प्रेमाने

एकत्र येतात कुटुंब

आपुलकी व मायेने........


वेगळी आहे जरी

प्रत्येकाची वेशभूषा

महाराष्ट्राची एकचं आहे

हो मराठी भाषा.......


सुख दुःखाच्या क्षणात

देतात मनापासून साथ

संकटकाळी धावून येतात

हजारो मदतीचे हात........


मोठमोठ्या संत, महात्मा

राज्या महाराजांची भूमी

कला संस्कृती व ज्ञानाची

नाही माझ्या महाराष्ट्रात कमी.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational