मायेचा आधार
मायेचा आधार
तारुण्याच्या काळात आई वाटते नकोशी क्षणभंगुर सुखासाठी बायको वाटते हवीशी
खूप कष्ट सोसून आईने तुला पोसले मोठे करण्यासाठी तुला अपार दुःख सोसले
काल आलेली पोरगी झाली तुझी राणी तुही तिच्यासंगे आनंदात गातोस गोड गाणी
तारुण्याच्या वाटेवर बायको भासे हिरवळ म्हातारी आई मात्र वाटते काटेरी बाभळ
दुःख सारे विसरून जी तुला जवळ घेते तिच माय माऊली आज आश्रमात राहते
लाज नाही वाटत का असे आईशी वागताना पाहून ह्रदय तुटत नाही का आई भीक मागताना
आज एवढा मोठा झालास आईच्याच कष्टावर गाडीवर बसतोस तेव्हा बायकोचा हात खांद्यावर
म्हातारपणात आयुष्याचा तूच तिचा धागा बन दुःख तिचे दूर करून तूच तिचा आधार बन
