STORYMIRROR

Trupti Dhawan

Inspirational

3  

Trupti Dhawan

Inspirational

स्वातंत्र्य पहाट

स्वातंत्र्य पहाट

1 min
412

उजाडली एक अनोखी पहाट 

आनंदाने भारावलेले मन,

सोनेरी किरणांनी हसलेली 

जल्लोषाचे सारे वातावरण....1

 

किती वर्णावे त्या दिवसाचे महत्त्व

लटकला अर्धा जीव टांगणीस

सप्तसुरांचा पसरला वारा एकजुटीने लढाई जिंकून 

यश खेचून आणले भरघोस ....2


सप्तरंगांनी खुलंला आसमंत सारा

७५ वर्षांची स्वातंत्र्य पहाट ध्यानी,मनी ठसली छान

चोहिकडे जिंकण्याचा घोषवारा

पंचप्राण एकवटुनी आले म्हणता मेरा देश महान..३


रक्तांच्या थारोळ्यात, जीव शहीद झाले 

थोरविरांचे आभार क्षणांक्षणास

म्हणूनच आपण सुरक्षित जगु शकतो बिनधास्त

१५ ऑगस्ट,१९४७ दिन खास..४


ध्वज तिरंगा फडके गगणावर

सनई चौघडा वाजे दारी

आनंदाश्रुच्या नयनी वाहे धारा

आतषबाजी प्रत्येका घरी...५


सोनियाचा दिन हा आला

सगळ्या मुखी एकच नारा

    आपला देश स्वतंत्र झाला


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational