STORYMIRROR

Trupti Dhawan

Romance

3  

Trupti Dhawan

Romance

अजब प्रेम

अजब प्रेम

1 min
216

सांग ना सख्या तू माझा होशील का....

समुद्राच्या लहरीतूंन अश्रु माझे शोधशील का....

हिमालयाच्या शिखरावरूनी हाक मला देशील का....

चंद्रांच्या शितलतेतून मन शांत करशील का....


आळवांच्या पानावरचं दवबिंदू पकडशील का....

पावसाच्या चिंबसरीत न्हाऊ मला घालशील का....

थंड गुलाबी गारव्यात ऊब मला देशील का....

इंद्रधनुष्याच्या रंगातुनी मन माझे ओळखशील का....


धरणीच्या त्या ज्वालामुखीतुन स्वप्न माझे शोधशील का....

पहाटेच्या धुक्यावरती साजश्रृंगार चढवशील का....

मोहविणा-या वा-याच्या लयीत मंत्रमुग्ध करशील का....

कातरवेळीच्या रंगांत क्षितीज धुंद रंगुन टाकशील का....


खळखळत्या झ-यात हास्य माझं खुलवशील का....

अंकांच्या त्या शुन्यांतूनी शेवट माझा होशील का...‌.

    सांग ना सख्या तू माझा होशील का....

     सांग ना सख्या तू माझा होशील का....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance