STORYMIRROR

Trupti Dhawan

Others

3  

Trupti Dhawan

Others

बहिणभावाची वेडी ही माया

बहिणभावाची वेडी ही माया

1 min
388

भावा तुला कळली नाही वेड्या बहिणीची माया

आई बाबांच्या सानिध्यात मिळो तुला सुखाची छाया......!


नको वाटा,नको हिस्सा नाही कसली अपेक्षा

फक्त मिळूदे तुझी प्रेमभरी माया निरपेक्ष.....!


रक्षेचा धागा बांधुनी हातावर तू सारी चिंता सोड

भावा तुझी आठवण येता,लागते माहेराची ओढ........!


क्षणांक्षणाला वाढत राहो गोडवा आपल्या नात्याचा

विसरूनी कडवे क्षण,प्रेमळ झरा वाहूदे आपुलकीचा......!


पवित्र बंधनाच्या धाग्याने रहस्य कळते जीवनाचे

आनंदाने जतन करूनी अतुट नाते बहिण भावाचे....!


आला राखी पौर्णिमा, भाऊबीज सण भागीदार होऊनी सुख दु:खाला

देवा कडे एकच मागणं सदैव सुखी ठेव माझ्या भावाला...!

    सदैव सुखी ठेव माझ्या भावाला.....!!!


Rate this content
Log in