STORYMIRROR

Trupti Dhawan

Inspirational

2  

Trupti Dhawan

Inspirational

पुन्हा नव्याने लाईव्ह दिवाळी

पुन्हा नव्याने लाईव्ह दिवाळी

1 min
171

समाजाप्रती आम्ही कर्तव्य दक्ष असणार

यंदा बाबा आमची दिवाळी लाईव्ह असणार 


सडा आणि रांगोळी आंगण सजवणार

समजुतदार पणाचं तोरण दारावर चढणार

फटाक्यांची आतषबाजी नभी रंगणार

रूग्णांची आणि जेष्ठ नागरीकांची काळजी आम्ही घेणार

    यंदा बाबा आमची दिवाळी लाईव्ह असणार


सुखाचा दिवा,आनंदाची वात तेवत ठेवणार

सनईचा सूर,मंगलमय वातावरण घरांघरात दुमदुमणार

नविन कपड्यात नटुन आम्ही बसणार

उगाच बाई बाजारात गर्दी नाही करणार

     यंदा बाबा आमची दिवाळी लाईव्ह असणार


भाऊबीजेला भाऊ प्रत्यक्षात भेटणार

फराळाचं ताट संतुष्ट लाडवानी सजणार

पई पाहुणे आता ऑफलाईन येणार

आपापसातील ऋणानुबंध अधिक घट्ट होणार

      यंदा बाबा आमची दिवाळी लाईव्ह असणार


मास्क लावलेला मुखवटा हास्याने खुलवणार

कोविड १९ चा प्राद्रुर्भाव नियम पाळुन रोखणार

संसंर्गाचा सामना घरांत बसून लढणार

आकाश कंदीलाच्या चिरस्थायी वातावरणाने सारी दिवाळी प्रकाशमय करणार

      यंदा बाबा आमची दिवाळी लाईव्ह असणार


स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा क्षण आला

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हांला परमेश्वराकडे ही एकच ईच्छा

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational