STORYMIRROR

Ranjana Khedkar

Inspirational

3  

Ranjana Khedkar

Inspirational

आई

आई

1 min
194

आई जिच्या ठायी, वसे वात्सल्य 

कृपासिंधू सम देणं, हेच तिचं जिणं 

सदा सुरक्षाचक्राचं बनून कवच 

ओठी स्मित हास्य, न दिसे क्षीण 


लेकरांसाठी ल्याली सहनशक्तीचा शेला 

आधारवड संसाराचा, अंगी लीनतेचा गुण 

लेकराच्या चेहऱ्यावर सुख पाहण्या आतूर 

वेचून सद्गुण, निंदणी करे ती अवगूण 


आधारस्तंभ ती घराचा, जसा वटवृक्ष 

संकटात उभी राही जशी विशाल पाषाण 

सदा भासे शांत मूर्ती, तिची अनुपम शक्ती 

ठेच लागता लेकरास येई अश्रुंना उधाण 


आई बने कल्पवृक्ष, अंगी नसतांना बळ 

दुःखात नेहमी बनते लेकराची ढाल 

करी संकट हरण, विना मोबदल्यान 

चुकता करी सदा क्षमा, हृदय विशाल 


आता थकली क्षिणली तरी लेकराची आस 

प्राण डोळ्यात आणून लेकराची पाही वाट 

घालून श्राध्दच जेवण पूर्ण कराल सोपसकार 

दोन शब्द गोड बोला, मृत्यूतही वाटेल थाट 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational