STORYMIRROR

Monali Kirane

Inspirational

3  

Monali Kirane

Inspirational

मुक्त समाज

मुक्त समाज

1 min
215

झालोय आपण स्वतंत्र देशाचे परतंत्र नागरिक,

वैचारिक बेड्यांनी जखडलेले दूरस्थ सकळीक.


प्रगती होत्ये मशिनांची जवळ येत चाललय जग,

ॲसिड अटॅक-ऑनर किलिंग करत का मागासतोय आपण मग?


भ्रष्टाचाराची वाळवी पोखरत्ये समाजाचं कपाट,

आतंकी हिंसाचार करतोय मानवजात भुईसपाट.


ताळ्यावर आणून धर्मांध कलूषित विचार,

एकजुटीने परास्त करू परकीय घुसखोर संचार.


उघडा मनाची कवाडं झिरपू दे स्वच्छ सूर्यप्रकाश,

मिळून सर्वजण पाहू शांती प्रगतीचे आकाश!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational