आठवणीतला पाऊस
आठवणीतला पाऊस
वादळाचा ढोलताशा
मेघगर्जना संगतीला
कंपित झाली धरणी
स्मरते पाऊस मजला
चिंब भिजवी अंगाला
छळे पावसाच्या धारा
रोमांचित झाले तनमन
झोंबी अंगाला गार वारा
सप्तरंगी इंद्रधनुष्य
मनमोहक देखावा
मोर फुलवी पिसारा
वेड हे लावीया जिवा
आसुसला भूतकाळ
वर्तमान स्वागताला
हाक देऊनी एकदा
आठवणीच्या पावसाला
शब्दसुमनांची सर घेऊन
असा पाऊस अवनी यावा
स्वच्छ करीत कणाकणाला
प्रफुल्लीत जनमानस व्हावा
