STORYMIRROR

Vishwadeepak Bijjewar

Inspirational

3  

Vishwadeepak Bijjewar

Inspirational

किमया निसर्गाची..

किमया निसर्गाची..

1 min
309

कोण निर्मितो आभाळात,

रूप सावळे मेघ दाट...

कोण दाखवून देतो त्यांना,

धरतीला भेटण्याची वाट...


कोण शिकवतो वृक्षांना,

बहरण्यास नवी पालवी...

कसा होतो हर्ष वेलींना ,

आनंदाने मान डोलवी...


कशी लागते पडण्याआधीच,

चाहूल थेंबांची त्या मयुरास...

कोण रेखितो आभाळामध्ये,

रंगीत इंद्रधनू ते खास...


कोण सांगते वसुंधरेला,

हिरवा शालू नेसायला...

संदेश कोण देतो त्यांना,

आकाश धरणीस येई भेटायला...


कोण आणतो सुख हसरे,

चेहऱ्यावर बळीराजाच्या...

थेंब टपोरे पडताक्षणीच,

खुलती वाटा नवस्वप्नांच्या...


कशी कळते पारिजातकास,

पहाटेची ती रम्य वेळ...

सुगंधी रंगीत सडा घालुनी,

दावी निसर्गाचा अद्भुत खेळ...


पाऊस पडताच आनंद घ्यावा,

त्यात घ्यावे चिंब न्हाऊनी..

निसर्गाची सारी किमया,

पाहून घ्यावी डोळे भरुनी..


कोण ? कसे? हे प्रश्न सारखे,

घेरून टाकती आपल्याला...

उत्तरं मिळण्यासाठी मानवा,

शरण जावे निसर्गाला...


निसर्ग हीच खरी देवता,

शरण जाता हेच उमजते...

पूजा नित्य करावी त्याची,

मग सृष्टीचे सोने होते...


जे पेरलं तेच उगवतं,

निसर्गाचा हाच नियम...

म्हणून त्याचं रक्षण करणं,

हेच असावं कर्तव्य कायम...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational