STORYMIRROR

Deepali Mathane

Inspirational

3  

Deepali Mathane

Inspirational

तुझीच रूपे माऊली

तुझीच रूपे माऊली

1 min
234

सावित्रीची तगमग 

शिक्षणज्योत जागली

शेण अंगी सोसूनीया

ज्ञान ज्योती पेटवली

   कल्पना गरुडझेप

   उंच उडाली घेऊनी

   प्रुथ्वीवरच्या परीची

   आकाशाला गवसणी

झाशीची ती राणी लक्ष्मी

भासली रणरागिणी

पाठीशी बांधून बाळ

कर्तव्य जपे जननी

    राधा होऊनी क्रिष्णाची

    प्रेम फुलवित नेले

    मीरा ती मुरलीधराची

    विषही प्राशन केले

हिरकणी ती बाळाची

उंच बुरूज चढली

मायेचा उच्चांक गाठी

अशी प्रेरणा घडली

     आदिशक्ती, महामाया

     उज्वल ते रुप तुझे

     तुझ्याच चरणी लीन

    होऊनी तुझ्यात साजे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational