भारत देश महान
भारत देश महान
शुर क्रांतिवीर या देशाचे
या देशाची शान
नमन करूया त्रिवार त्यांना
माझा देश महान ।।ध्रु।।
सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडूनी
देशासाठी लढले रे
सुखदेव राजगुरू भगतसिंग ही
फासावरती चढले रे
वंदन करुनी भारत भू ला
अर्पण केले प्राण ।।१।।
जलियनवाला बागेमध्ये
गोळ्या मारून खांडोळी
मंडालेचा तुरुंग असो वा
अंदमानची कोठडी
चले जाव म्हणता बापू
सामील झाले थोर सान ।।२।।
लोकमान्य टिळक महात्मा गांधी
स्वातंत्र्यवीर सावरकर
आझाद सेना नेताजींची
झुकली नाही खरोखर
या विरांचा या मातीचा
देशाला अभिमान।।३।।
गुलामगिरीतून मुक्ती मिळवली
परत पाठवून ब्रिटिशाला
पहिले पंतप्रधान नेहरूजींनी
तिरंगा झेंडा फडकवला
राजेंद्र प्रसाद व बाबासाहेबांनी
लिहिले देशाचे संविधान।।४।।
