STORYMIRROR

Savita Dharmadhikari

Inspirational Others

3  

Savita Dharmadhikari

Inspirational Others

होळी

होळी

1 min
292

दर वर्षी साजरी करतात होळी

लाकड गवर्या राॅकेल ओतून

पेटवतात आग आणि बोंबलतात

मनगटावर तेल ओतून

का तर म्हणे आज होळी आहे

आज तर बोंबलण्याचाच सण आहे

जमतात उनाड पोर

ओढून आणतात लोकांची लाकडी

आग भडकते अपघात होतो

प्रथा परंपरा जपाण्यास पण अशा पद्धतीने 

किळस येतेय रे अशा वागण्याची

एकविसाव्या शतकात सार कांही बदलतय

मग पर्यावरण पूरक होळी करा

झाडाची नका करू कत्तल

मानाच्या पाच गोवर्या रचून

वाळलेली झाडाची पान घ्या पेटवायला

जुने जळमटं काढून टाका मनातील

चांगल्या विचारांसाठी रिकामा करा

तुमच्या मेंदूचा कप्पा

 विविध केमीकलयुक्त रंग नका वापरू

अगदी कमी खर्चात नैसर्गिक रंग बनवा. 

त्वचा अधिक तजेलदार बनवा.

होळीची धुळवड लावून करावे स्नान

शरीराचे सौष्ठव वाढेल छान

जुने ताणतणाव, नकारात्मक विचार काढा

होळीच्या सणाचा आनंद घ्या थोर सान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational