वर्षा तू वर्षव ग
वर्षा तू वर्षव ग
वर्षा तू वर्षव धारा
आसमंत भिजू दे सारा
चिंब चिंब होऊ दे धरा
घन ओथंबून बरसू दे जरा
रिमझिम पाऊस बरसु दे
झाडे आनंदे डोलू दे
किलबिलाट पक्ष्यांचा होऊ दे
नद्या नाले तुडुंब भरू दे
अजून तू का कोपला
शमव तुझ्या रागाला
वर्षव अविरत धारा
आनंदे डोलूदे पाखरा
मखमल हिरवी पांघरून
पहुडावी भासे निशीदिन
अंत नको पाहू
मृगजळ नको दावू
धो धो बरसू दे धारा
आसमंत भिजू दे सारा