STORYMIRROR

Savita Dharmadhikari

Romance Children

3  

Savita Dharmadhikari

Romance Children

पळस

पळस

1 min
292

पाने हिरवीगार पळसाची

एकटी कधी वाढत नसतात

मानवाला संदेश देतात एकीचा

पळसाला पाने तीनच असतात 


हेवा वाटतो रे मला तुझा

तुझ्या फुलांचही तसच असत

लालभडक फुलांचे गुच्छच दिसतात

रूसलेलं एकट फुलं नाही दिसत


शिशिरात तुझी पाने गळतात

शेंडे फुलांनी मात्र लखडतात

वसंत ऋतूच्या आगमनाने

पुन्हा पाने नव्याने येतात


कितीतरी पंगती तृप्त होतात

तुझ्या पानांच्या द्रोण अन् पत्रावळीवर

किती पिढ्यांचे आशीर्वाद आहेत

आजही तुझ्या पानाबरोबर 


लग्न मुंजीच्या वेळी पळसाची 

डहाळी लागते शुभकार्याला

अौषधी म्हणूनही वापर तुझा

काष्ठे ,समिधा म्हणून यज्ञाला


वनी डोंगरी वास्तव्य तुझे

कठीण परिस्थितीत वाढतोस

काष्ठे ,पाने आपले अवयव सारे

मुक्तपणे वाटत राहतोस.

 

देशील का लालेलाल फुलांची

लाली नववधूच्या ऒठाला

निघणार नाही आजन्म ती

खुलवेल तिच्या सौंदर्याला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance