कविता
कविता
1 min
416
माझे मन अन् माझे तन
अलगद असते धुंदीत
काय सांगू मीच असते
सतत तिच्याशी बोलत
सांज सकाळी कातरवेळी
कधी उन्हात कधी रानात
कधी आंब्याच्या बनात
अस्वस्थ करते एका क्षणात
ती मला भेटते एकटी असताना
म्हणते घे पेन आधी अन् लिही
उफाळून येतॊ जसा समुद्र
कधी,अक्राळविक्राळ तरंग कधी शांत
तसेच भावनांचे तरंग उठतात
एकानंतर एक शब्द मनात येतात
लेखनि आकार देते त्या सर्वांना
कवितेचा उगम होतो कांही क्षणात
मी अलगद गोजारून जेव्हा पाहते
कविता माझा आनंद व्दिगूणीत करते
माझ्या कंठातून ती नकळत डोकावते
माझ्या ओठावर ही तीच सतत असते
