रंगात रंगुनी जाऊ
रंगात रंगुनी जाऊ
1 min
224
सण असे हा रंगाचा
सप्त रंग मिळूनी सारे
रंग असे हा प्रेमाचा
स्नेहभरे करू साजरा रे
रंगात नाहली राधा
कृष्ण सखयाची पिचकारी
गोपीसवे रंग खेळे मुरारी
नाहुनी निघाली गोकुळ नगरी
रंगाने चेहरे बदलती
अंतरंग एकच असती
जो रंग असतो ज्याचा
स्वभावही तसेच असती
रंग असावे नैसर्गिक
नितळ होईल काया सतेज
कृत्रीम नको हानीकारक
निवळेल तनुचे तेज
रंग प्रेमाचे तसेच द्वेषाचे
रंग मतभेदांचे रंग ऐक्याचे
रंग सरड्याप्रमाणे बदलतात
विश्वासघाती माणसांचे
