STORYMIRROR

Savita Dharmadhikari

Tragedy Inspirational Children

4  

Savita Dharmadhikari

Tragedy Inspirational Children

मी शाळेत कसं यायचं

मी शाळेत कसं यायचं

1 min
403

कधी इथं कधी तिथं

रोज बापासंग काम करायचं 

रोज विडी काडी पुरतं

बापाला पैसे द्यायचं

सांगा गुरुजी मी शाळेत कसे यायचं


 रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ करताना

 जीव टांगणीवर ठेवून कसरत करायचं 

बाप ढोल वाजवतो माय गोळा करते पैका

मग तारेवरुन कोण चालायचं

सांगा गुरुजी मी शाळेत कसे यायचं 


वीटभट्टीवर कामाला गेलं की 

बापानं ईटा बनवायचं 

चिकूल बनवायला मायला 

पाणी कोण द्यायचं

सांगा गुरुजी मी शाळेतं कस यायचं


ऊसतोड मजुरांची पाल 

रोज वेगळ्या शिवारात जाते

तिथे घर थाटताना 

सामान कोण लावायचं 

सांगा गुरुजी मी साळतं कसं यायचं


उसाच्या मोळ्या बांधते माय

बापानं गाडी भरायचं 

गाडी उलाल होताना 

टेकन कोण लावायचं 

सांगा गुरुजी मी शाळेत कसं यायचं 


माय पेटवून चुल्हा 

भाकर भाजते तव्यावर

माल टाकून झिंगणाऱ्या बा ला 

घरी कोण आणायचं 

सांगा गुरुजी मी शाळेत कसं यायचं


 मायनं बापाशिवाय आम्हाला

 जेवायला नाही द्यायचं 

बाप नावाच्या जनावराला 

दारूच्या नशेत ओढून कोण आणायचं 

सांगा गुरुजी शाळेत कसं यायचं


गुरुजी मला सपन पडायचं

सुटाबुटात शाळेत यायचं 

बर माझ्याशिवाय माय बापानं

सांगा कसं जगायचं

सांगा गुरुजी मी शाळेतं कस यायचं


कधीमधी मी मित्राला भेटायला जायचं

पैसा नोकरी सारे होते त्याच्या मायबापाकडे

दोघांचं दिवसातून कितीदाही भांडण व्हायचं

माय बापाने लेकराला कधी समजून घ्यायच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy