STORYMIRROR

Savita Dharmadhikari

Others

4  

Savita Dharmadhikari

Others

आधारवड

आधारवड

1 min
567

मातीत खोलवर रूतलेल्या मुळा

धरून ठेवतात उन्मळून पडणाऱ्या वृक्षाला

कितीही झंझावाती वारा आला तरीही

डळमळते पण पडत नाही आधार असतो


घरातले लहान मुले नातवंडे

पंखात बळ देण्याची प्रेरणा

निर्माण करणार एक जूनं खोड

घट्ट पकडून ठेवतात नात्याचे बंध


आज्जी म्हणजे वात्सल्याचा झरा

आज्जी म्हणजे प्रेमळ वारा

सर्व नातवाची लपण्याची जागा

आज्जी म्हणजे नातवाचा वारा


प्रभावती म्हणजे ज्ञानाची प्रभा असणारी 

या वयात ही अखंड पेपर वाचणारी

सर्वांच तोंडभरून कौतुक करणारी

नातींच्या करीयरसाठी प्रेरणा असणारी


सभागृहात बसलेली लहानथोर मंडळी

अमुल्य गुणगाताना ऐकले आज्जीची

धार्मिक ग्रंथाची वाचन गोडी लागावी

इच्छा पुरवली नातीने सहस्रचंद्रदर्शनाची


फुलांनी सुंदर मढवलेली तुला व त्यात ग्रंथ 

पगडीघालून बसलेल्या पैठणीतल्या आज्जी

सुग्रास जेवन आणि थंडगार शर्बत

जाताजाता मनोगतासोबत कडक चहा


अखंड ज्ञानलालसा व आरोग्य लाभावे

 नातवंडांच्या प्रतवंडामध्ये आता रमावे

ऐश्वर्य आरोग्य समृद्धी अखंड लाभावे

हीच इच्छा लातूरकर धर्माधिकारी परीवाराने तुम्हासाठी मागावे..


Rate this content
Log in