Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Dharmadhikari

Inspirational

3  

Savita Dharmadhikari

Inspirational

महिला दिन

महिला दिन

1 min
254


भल्या पहाटे लवकर उठतेस

घरची कामेही तूच करतेस

सर्वाला नाश्ता व गरम चहाही देतेस

मुलांचही सार तूच आवरून देतेस


जमेल का ? तुझ्यासारख जगावं म्हणतो 

आज महीलादिन साजरा करावा म्हणतो 


वेळेकडे तुझे सततच असते लक्ष

कामात नेहमीच असतेस दक्ष

आॅफीस असो की घर असो

नेहमीच असतेस कर्तव्यदक्ष


जमेल का ? तुझ्यासारख जगावं म्हणतो 

आज महीलादिन साजरा करावा म्हणतो 


मुलांचे शिक्षण व आॅफीसकामही तूच करतेस

मुलांना संस्कारातून मुल्यशिक्षणही तूच देतेस

सणवार रितरीवाज गोडधोड ही तूच करतेस

पै पाहुण्यांचा पाहुणचार हसतमुखाने करतेस


जमेल का ? तुझ्यासारख जगावं म्हणतो 

आज महीलादिन साजरा करावा म्हणतो


कधी कविसंम्मेलनाला,कधी पिक्चरला

नटून थटून हळदिकुंकवालाही जातेस

परंपरा ,संस्कृतीचे रक्षणही तूच करतेस

प्रत्येकाच्या आवडीनिवडी तूच तर जपतेस


जमेल का ? तुझ्यासारख जगावं म्हणतो 

आज महीलादिन साजरा करावा म्हणतो 


तुझी सहनशक्ती खरच आहे फार

आजचा दिवस थोडी मला दे उदार

स्वयंपाक, धुणी,भांडी केवढा हा डोंगर

मी फक्त विचार करूनच झालो बेजार 


स्त्रीशक्तीच नियोजन आता शिकावं म्हणतो

पुढच्या वर्षी महिलादिन साजरा करीन म्हणतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational