पानगळ
पानगळ
शिशिराची चाहूल होता
निसर्ग नवे रूप घेई
वस्त्र पालटून सारे
नवा जन्म जणू घेई
पानगळ सुरू होते
जणू पाने मृत झाली
नवी येती नव्यानेही
जन्म देतो त्यांचा वाली
नवी पालवी फुटता
वृक्ष पुन्हा डॊलू लागे
निसर्ग हिरवा नटलासे
राघू मैना नाचू लागे
वेगवेगळी ही फुले
बहरतो पानोपाणी
गाणे येई कंठातूनी
कोकीळेचे मधुर गाणी
दर वर्षी पानगळ
दुःख ,नाही करायचे
नियम निसर्गाचा मानू
जगू निसर्गासम हसायचे
