STORYMIRROR

Ashvini Mehta

Inspirational

3  

Ashvini Mehta

Inspirational

साथ देशील का

साथ देशील का

1 min
200

सांग ना, तू ही तिला,

कधीतरी, साथ देशील का

पाठीवरती, शाबासकीची

तू थाप, देशील का


अव्यक्त भावना, घरातील पणतीच्या

 तु समजून, घेशील का

स्वप्न तिची, पूर्ण करण्या,

सोबत उभा, राहशील का


सर्वत्र पसरला तिच्या ,

कर्तृत्वाचा, भव्यदिव्य प्रकाश

साथ देता वाटेल ,तिलाही मग 

ढेंगणे आकाश


हिंमतीने केली तिने

सर्व ‌क्षेत्र काबीज,

संस्कृती जपत बनली

ती हिंदुस्तानी तावीज


एकविसाव्या शतकात घडे 

 स्त्री भूनहत्या, हुंडाबळी, बलात्कार,

आरोपीस लगेचच देवुन फाशी

न्यायदेवतेने घडवावा चमत्कार,


पाप मोठे करताना अपराध्यांना

दिसावा पुढे साक्षात काळ,

सच्ची साथ मिळुनी येईल

समाजात स्त्री ‌ला सुकाळ,


साथ देवुनी स्त्रीचा

जपावा नेहमी सन्मान, 

स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी आली 

आता तरी द्यावा तिला मान,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational