STORYMIRROR

Ashvini Mehta

Inspirational

3  

Ashvini Mehta

Inspirational

क्रांतीसुर्य

क्रांतीसुर्य

1 min
152

सावित्रीच्या लेकी आम्ही

जगतो अभिमानाने,

स्त्री हक्कांसाठी लढले

महात्मा प्राणपणाने,


बुरसटलेल्या लोका

जेव्हा झाली हिन दशा

क्रांतीसुर्य हो दाखवी

परिवर्तनाची दिशा


ग्रंथ लिहिले अनेक

वाचता येई हुरूप ,

सत्यशोधक समाज

समताधिष्ठित रूप,


गुलामगिरीत जागे

शोषणाविरुद्ध बंड

निद्रिस्त समाजालागे

शेतकऱ्यांचे आसूड


समाजसुधारक व

विचारवंत हो फुले

समाज कार्यासाठीच

त्यांचे जीवन अर्पीले.   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational