मनाचे किनारे
मनाचे किनारे
1 min
176
ओले झाले सारे
मनाचे किनारे
स्वार्थी या जगात
ना कोणी सहारे
आपलेच दुःख
ना कुरवाळता
होऊनी सक्षम
जगावे हो आता
जमलेच तर
दया कोणा आधार
शब्दरूपी साथ
करा सु -विचार
शब्दांनीच झाले
हे जीवनगाणे
जगा आनंदाने
नको रडगाणे
होईल मदत
आपल्याकडून
सेवेचा वारसा
जपा मनातून
दुर होई सारी
मनाची निराशा
जगण्यास बळ
देई नवी आशा
