स्व मिठीत जगून घे...
स्व मिठीत जगून घे...


दुःखाच्या सागरात न डुबता
जगून घे माणसा प्रत्येक क्षण
दुःखाश्रू पिऊन चिंता न करता
उद्या पदरात कोणते पडेल दान
संघर्षाच्या लढाईत झुरताना
अपयशाचा डोंगरही उभा राहील
पण जगून घे एकनिष्ठेने, धैर्याने
यशही एकदातरी नक्की पाहशील
कधी अंतर्मनाच्या हळवेपणाला
स्मरून अलगद आलिंगन देऊन
नकळतपणे ओल्या राहिलेल्या
हुंदक्यांना जगून घे मिठीत घेऊन