थोडा प्रतिसाद हवा
थोडा प्रतिसाद हवा


ना वाद हवा
ना संवाद हवा
फक्त कवितेला
थोडा प्रतिसाद हवा
सायंकाळी आकाशात
दिसतो डुबताना सूर्य
मनसोक्त उडणारा
तो पाखरांचा थवा
मी शोधू लागतो
त्यात मग स्वत:ला
मी त्यातलाच आहे
की मग कुणी नवा
कविता म्हणजे काय
शब्दांवर शब्दांची रास
आणि हृदयाच्या चुलीत
भावनांचा तापणारा तवा
लोक खूप आहेत या
दुनियेत पण कुणीतरी
आपला म्हणणारा
आता मला इथं हवा
एका क्षणात वेदना
घालविण्यासाठी
बनवलेली असेलही
कुणी कुठलीशी दवा
पण वाटतं आता
मला लोखंडासाठी
परिसाचा थोडासा
तुकडा मात्र तो हवा