STORYMIRROR

Vrinda Rao

Inspirational

3  

Vrinda Rao

Inspirational

आई

आई

1 min
11.6K

अष्टाक्षरी


खरं सांगा तुम्ही कोणी

आहे का देव पाहिला

जन्मासंगे हरक्षणी

सुखासाठी त्वा वाहिला।।1।।


आई नावाची देवता

वात्सल्याचे मूर्त रूप

स्वजीवना जाळीते

जणू चंदनाचा धूप।।2।।


आई नावाची या मुळी

फोड कोणी केली असे

सत्य परि वाटे मला

आहे ईश्वर ही असे।।3।।


आई नावाच्या राज्यात

प्रेम ममता वात्सल्य

किती मोठा राजा परि

जपे लेकरांचे बाल्य।।4।।


आई ज्ञानाचे भांडार

संस्काराचे अधिष्ठान

उतराई न होईल

असे प्रेमप्रतिष्ठान।।5।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational