आल्या जुळून रेशीमगाठी
आल्या जुळून रेशीमगाठी


देव म्हणे स्वर्गातच
गाठी लग्नाच्या बांधतो
तिला तो आणि त्याला ती
नशिबाने भेटवतो।।
असं होतं तरी का बरं
माझं नशीब होतं रुसलं
जीवनसाथ देण्यासाठी
कोणी मला नव्हतं पुसलं।।
आणि अचानक झालेली
ती आपली नजरानजर
आपल्यासाठी नजारा
झाला प्रेमाचा अजरामर।।
ठरवून टाकलं मग ही
नकोच तोंडओळख नुसती
साथीने आता करू आपण
हृदयात एकमेकांच्या वस्ती।।
उमगले दोघां दोघे
आहो एकमेकांसाठी
तत्क्षणी आमुच्या आल्या
जुळून रेशीमगाठी।।