आल्या पावसाच्या धारा
आल्या पावसाच्या धारा

1 min

11.9K
अष्टाक्षरी
तप्त ऊन डोक्यावरी
रणरण सारीकडे
सारे उजाड उदास
अंगी घामाचेच सडे।।
नाही कुठंही सावली
ओकेबोके रस्ते झाले
पडे तोंडाला कोरड
आणि जीवाची काहिली।।
आस गारव्याची आणि
देवा पाहसी परीक्षा
जीव लागला कोंडाया
नको देऊ अशी शिक्षा।।
अचानक अवचित
आला झुळकत वारा
गंध भिजल्या मातीचा
आल्या पावसाच्या धारा।।