देव नाही देवालयी
देव नाही देवालयी


देव नाही देवालयी
देव आहे मानवात
मानवाच्या विचारात
देव त्याच्या आचारात...
देव नाही देवालयी
देव लहान मुलात
संगोपन नीट करा
सारे या बालवयात...
अनुभव नीट द्यावा
ज्ञान अमर्याद द्यावे
बोधकथा सांगाव्यात
शील सर्वांनी जपावे...
निसर्गाचा अनुभव
प्रत्यक्षात द्यावा त्यांना
नैसर्गिक उपहार
शिकवावा बालकांना...
ज्ञानबिंदू पाजावेत
माया, प्रेम जागवावे
शान भारताची ठेवू
ज्ञानातून शिकवावे...
घरदार स्वच्छ ठेवू
निगा अंगणाची राखू
वृक्षवेली लावू दारी
फळं त्यांची गोड चाखू...