STORYMIRROR

Varsha Shidore

Inspirational

3  

Varsha Shidore

Inspirational

संधी पहाट...

संधी पहाट...

1 min
12.2K

फुलात न्हाली पहाट ओली

नव दिवसाची पर्वणी आली

सुखद क्षण देण्या नवलाईची

आनंदवन सुप्रभात झाली... 


पहाटेच्या रमणीय दृश्यात 

हिरवीगार पावले रमली 

निसर्गाची डोळे दिपवणारी 

सुंदर मेजवानी मिळाली... 


कुजबुज पशु-पक्षी-झाडांची 

नि वर्दळ माणसांची थाटली 

मोहक, रंगीन फुलांची चादर 

मनाचा कानोसा घेऊन गेली... 


सोनेरी किरणांची ओवाळणी 

नव आशेची एक संधी वाटली 

जीवनातले त्राण हरणारी ती 

पहाट नवचैतन्याची भासली... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational