ग्रंथालय (सहाक्षरी)
ग्रंथालय (सहाक्षरी)

1 min

12.5K
चला ग्रंथालय
पुस्तक वाचुया
अभ्यास करून
उत्तर शोधुया
पुस्तक देतात
सदा खरे ज्ञान
मित्र तोच आहे
आता तरी मान
वाचन ते अन्न
आहे या मनाचे
स्वतःचे समृद्ध
विश्व करायचे
ज्ञान कण वेचा
या पुस्तकरूपी
स्वतः करा मोठे
व्हावे विश्वरूपी