शेतकरी दादा
शेतकरी दादा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
माझा शेतकरी दादा
उभा काळ्या ढेकळात
हिरे मोती चकाकती
त्याच्या उभ्या शिवारात
गावी त्याची ती पडाळ
असे खरा राजवाडा
किलबिल ती पक्ष्यांची
असे देवाचा तो गळा
न्याहरीची कांदा भाकर
कौलातून उन्हाचा प्रहर
नाही तोड त्या घराला
फिके झळाळती घरं
रात्री कंदील लागता
नातवंडं होई गोळा
गुजगोष्टी त्या आज्जीच्या
मन लाऊन ऐकता
असे गाव माझं न्यारं
ताण्या सोन्या ती खिल्लारी
नांगरणीला जोडी भारी...