स्वप्नातही वाटलं नव्हतं
स्वप्नातही वाटलं नव्हतं


कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं
असे काही होईल
महाराष्ट्राच्या मुलीला
हे काळ योग येतील
कधी लोकांची ती नजर
करते जीव घायाळ
हलकेच नयन खाली
मग घालती ती ताय
किती लचके तोडीले
किती केली हो नामुष्की
ही जात आहे स्त्रीची
झुकणार नाही कधी
जिजाऊंची काय महती
आम्हास कोण मारे
तेव्हा तलवार होती
आताही तीच आहे
कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं
असे काही होईल
एका लेकीला नेऊन सासू
सून म्हणून पेटून देईल
अरे लेकीच
ा तो बाप
रडतोय ढसा ढसा
कसे फेडणार पाप
कशी केली रे निराशा
फक्त स्त्रीच मान नाही
देऊ शकला का नवरा
त्या स्त्रीच्या पोटी येतो
तुझ्या वंशाचा तो हीरा
किती कराल हो अन्याय
आता स्त्रीचे राज्य आहे
तुम्हा स्वप्नात वाटले
राज्य आम्हास भेटले
करा स्त्रीची हो इज्जत
ठेवा तिचाही तो मान
तीही कुणाची मुलगी
आणि कुणाची बहिण
धरू नका उरी स्वप्न
आता स्वप्नही आमचे
आणि देशही आमचा
भारत माता आहो आम्ही आणि सृष्टीही आमची...